“धर्म सेन्सॉर बोर्ड” असंवैधानिक आहे – दिपक केदार

पुणे : पत्रकार परिषद घेऊन शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती नामक धर्मगुरू ने धर्म सेन्सॉर बोर्डाची स्थापना केल्याचे जाहीर केले. दिल्लीला कार्यालय सुरू केले असल्याची माहिती दिली. देशभर बॉलिवूड, साहित्य, कला, शिक्षण क्षेत्रात धर्मावर आधारित सर्व प्रसारित माध्यमांवर अंकुश ठेवण्यासाठी अशा वांजुठ्या बोर्डाची स्थपना केल्याचे त्यांनी जाहीर केले. बेशरम रंग गाण्यात भगव्या रंगाची बिकनी घातलेली दीपिका पादुकोण आणि पठाण फिल्म मुळे त्यांनी हे असंवैधनिक पाऊल उचलले आहेत
याचा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी निषेध केला असून ट्विट करून त्यांनी कार्यवाहीची मागणी सुद्धा केली आहे.
“धर्म संसद बोर्ड” हे असंवैधानिक आहे, अशा बोर्ड स्थापन करणाऱ्या शंकराचार्यावर कार्यवाही करावी.
संवैधानिक संस्था असताना असल्या धर्मवेड्या मानसिक रोग्यांच्या धर्म सेन्सॉर बोर्ड कशासाठी? हा पायंडा थांबवा अन्यथा धर्मा धर्माचे सेन्सॉर निर्माण होतील अन् संविधानाचे महत्व कमी होईल!