भीम आर्मी कार्यकर्त्यांचा ऑल इंडिया पँथर सेनेत जाहीर प्रवेश चंद्रशेखर झनके मलकापूर तालुका अध्यक्ष पदी

बुलढाणा : आज मलकापूर येते बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रकाश भाई धुंदळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी भीम आर्मी मधील पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांनी ऑल इंडिया पँथर सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पँथर झंझावत सुरू असून जिल्हाभर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात संघटनेत सामील होत आहे.
मलकापूर तालुका अध्यक्ष पदी चंद्रशेखर बाळू झनके यांची निवड करण्यात आली आहे.
मलकापूर तालुका अध्यक्ष पदी चंद्रशेखर बाळू झनके, नांदुरा तालुका अध्यक्ष पदी
संदीप बादल इंगळे, नांदुरा तालुका अध्यक्ष पदी
संदीप बादल इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपस्थित बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रकाश भाई धूंदळे, जिल्हा महासचिव अतुल भाई इंगळे, जिल्हा निरीक्षक विजय भाई वानखडे, जिल्हा प्रभारी राहुल भाई वानखडे, खामगाव तालुका अध्यक्ष अजय भाई गवई, बंटीदादा गव्हांदे, प्रवीण गुरचळ, भिमराज इंगळे, सागर तायडे, प्रज्ञावंत तायडे, मुकेश वाकोडे, प्रविण इंगळे, सौरभ झनके, अक्षय इंगळे, कमलेश इंगळे, योगेश घाटे, गोपलसिंह चव्हाण, लवप्रित मेहरा, ओम टप, भारत वानखडे आणि रोशन चंदनशिव उपस्थित होते.