चळवळ
पारधी समाजाच्या कार्यकर्त्यांनी ऑल इंडिया पँथर सेनेत प्रवेश केला!

लोणार : आज ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रिय अध्यक्ष दीपक केदार यांनी लोणार येते धावती भेट दिली. यावेळी पंचकृषीतील नामांकित नाव ज्यांच समाजकार्यात मोठ नाव आहे. गोरगरीबांच्या न्यायासाठी त्या लढा देतात अशा पारधी समाजाच्या हेमाताई राहुल पवार यांनी संघटनेत जाहीर प्रेवश केला.
यावेळी त्यांना नियुक्ती पत्र देऊन लोणार महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. लवकरच रिसोड, लोणार, बुलढाणा जिल्ह्यातील पारधी समाजाचा मेळावा होणार आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित काकडे, वाजेद शेख, सचिन मुळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.