चळवळ

ऑल इंडिया पँथर सेनेचा उमेदवार अचानक चर्चेत; धाबे दणाणले!

चिंचवड : ऑल इंडिया पँथर सेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार किशोर काशीकर हे अचानक चर्चेत आले असून त्यांच्या प्रचाराने आघाडी घेतली आहे. शेवटच्या टप्प्यात त्यांच्या प्रचाराने वेग पकडला आहे. शेकडो घरगुती बैठका त्यांनी केल्या, झोपडपट्टी भागात, बौध्द, मुस्लिम, गरीब कामगार घटकामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला आहे.

अश्विनी लक्ष्मण जगताप, राहुल कलाटे, नाना काटे यांच्या तिरंगी लढतीची चर्चा हे पेड न्यूज वाल्यांनी उभा केलेला बागुलबुवा आहे. चौरंगी लढतीची शक्यता नाकारता येणार नाही. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी समाजाच्या न्याय हक्कांसाठी, अन्याय अत्याचार विरोधात मोठा संघर्ष महाराष्ट्रात त्यांनी केलं आहे. या मतदारसंघातील 25% बौध्द तेवढाच मुस्लिम घटक लक्ष्यात घेऊन त्यांनी उमेदवारी दिली. त्यांना आत्मविश्वास आहे की समाजाचे मतदार माझ्यावर, माझ्या कामावर विश्वास ठेवतील.

झोपडपट्टीत चर्चेला उधाण आले आहे. आपला माणूस दिपक केदार असून त्यांनी दिलेल्या उमेदवार किशोर काशीकर यांची निशाणी बॅट दाबण्याचा निर्धार होऊ लागला आहे. कँपाईग्न मध्ये सुद्धा त्यांनी आघाडी घेतलेली आहे. प्रस्तापित,भांडवलदार, पैसा, जातीचे मक्तेदार यांच्यासमोर बलाढ्य समाजाची शक्ती घेऊन एक वाघ उभा राहिलेलं आहे.

अचानक हा उमेदवार चर्चेत आल्यामुळे प्रतापितांची डोकेदुखी वाढली आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!