चळवळ

आंबेडकरी आंदोलक पिएचडी करणाऱ्या बौध्द विद्यार्थिनीचे घर जळून खाक!

लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिकणाऱ्या कल्पना कांबळे या आंदोलक सुद्धा आहेत. त्यांचं गावी असलेलं घर जळून खाक झालेलं आहे. कुटुंबाला रस्त्यावर यावं लागलं आहे, सर्व सामान, कागदपत्रे सुद्धा जळाली आहेत.
Barti ची फिलोशिप साठी 2018 ला त्या पात्र झालेल्या आहेत पण त्याची अमांबजावणी Barti ने केली नाही. सर्व विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी राज्यव्यापी लढा सुद्धा दिलेला आहे. हलाखीची परिस्तिथी असताना त्या लढत आहेत, झुंज देत आहेत, कर्जबाजारी होऊन शिक्षण घेत आहेत. आई मोलमजुरी करून मुलींना शिक्षण देत आहे.

समाजाचं हे लेकरु आज संकटात आहे. त्यांना मदत करून बळ देणे गरजेचे आहे. त्यांचे बँक खात्याचा डिटेल सोबत देतोय, त्यांना मदत करा आणि “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या ब्रीद वाक्याला जिवंत ठेवा.

कांबळे कल्पना बापूराव मु . पो . वायगाव ता. अहमदपूर जि . लातूर बँक खाते नं. 31764270682 IFSC SBIN0007919 Sbi bank samarthnagar aurangabad. Phone pay , Google pay no 9881247166

लातूर कार्यकर्त्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन शासकीय मदतीसाठी व समाजातून मदत उभा करून देण्यासाठी पुढे यावे!

  • दिपक केदार
    राष्ट्रीय अध्यक्ष
    ऑल इंडिया पँथर सेना

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!