चळवळ

सर्व निवडणुका स्वबळावर; ऑल इंडिया पँथर सेना तयारीला लागली!

मुंबई : गेली सहा वर्ष एकमेव ऑल इंडिया पँथर सेना दलित अन्याय अत्याचार विरोधात लढत आहे. राज्यभर संघटनेने जाळं निर्माण केले आहे. सप्टेंबर ऑक्टोबर 2023 दरम्यान राज्यातील प्रलंबित निवडणूका होणार आहेत. यात स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका होणार आहेत.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सहा महिने वर्षभर निवडणूका आहेत.

लोकसभा, विधानसभा सुद्धा लागणार आहेत. ऑल इंडिया पँथर सेनेनी याआधी निळा झेंडा हातात घेऊन स्वबळावर पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक लढवून स्वाभिमानी भूमिका जाहीर केलेली आहे. तीच भूमिका येणाऱ्या लोकसभा विधानसभेला राहणार असल्याचे दिपक केदार यांनी जाहीर केलेले आहे.

अनेक प्रश्न घेऊन आझाद मैदान येते निळा जनउठाव आंदोलन प्रसंगी भाषणातून दिपक केदार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की आता सर्वच सभागृहात पँथर गेल्याशिवाय पर्याय नाही. ही व्यवस्था आपली नाही, समाजाला आज कुणी वाली नाही. अशावेळी आपण राजकीय भूमिकेतून प्रस्तापित जातीयवादी घटकांना शोषितांच्या सत्तेसाठी सुरुंग लावला पाहिजे. आता कामाला लागा असे आदेश यावेळी दिले होते. त्या अनुषंगाने कार्यकर्ते कामाला लागले असून लवकरच पुणे किंवा मुंबई येथून राज्यव्यापी मेळाव्यातून डरकाळी फोडली जाईल असे ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांनी सांगितले आहे.

दिपक केदार यांच्याकडे तरुणांची ताकद असून त्यांना अनुलेखाने मारून चालणार नाही. त्यांच्या संघटित कार्यकर्त्याला अनेक आमिष दाखवले गेले पण केडर फुटलेल नाही. त्यांच्या स्वाभिमानी भूमिकेला कार्यकर्ते प्रतिसाद देत असून कसलेही पाठबळ नसताना आज सर्वात मोठं संघटन म्हणून ऑल इंडिया पँथर सेना राज्यात ओळखलं जाणारं संघटन आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!