चळवळ
लोकसभा निवडणुकीत पँथर महत्वाच्या भूमिकेत असणार!

पुणे : ऑल इंडिया पँथर सेना लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा आपली भूमिका जाहीर करत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार मैदानात उतरविण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. राज्यातील राखीव मतदार संघात त्यांची ताकद मोठी आहे.
याबद्दल दिपक केदार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत आम्ही महत्वाच्या भूमिकेत राहणार आहोत. आमची ताकद जिथे आहे ते जिल्हे आम्ही टार्गेट करत आहोत. त्या संदर्भात औरंगाबाद येते बैठक सुद्धा आमची झालेली आहे. आमच्या भूमिका लवकरच स्पष्ट होतील.
असे मत त्यानी व्यक्त केले.