दिल्लीत लय पळू नका; तुमचेही गोपीनाथ मुंडे होतील – दिपक केदार

पुणे : आज अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा, पुणे येते ऑल इंडिया पँथर सेनेची सभा झाली. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
नुकतेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली की एकनाथ शिंदे खुप आजारी आहेत आम्ही ते काहीही बोलले तरी 15 ऑगस्ट नंतर त्यांना बळजबरी दवाखान्यात नेणार आहोत असे विधान शिरसाठ यांनी केले आहे
यावर दिपक केदार म्हणाले; एकनाथ शिंदे, अजित पवार यांना माझा सल्ला आहे. जसा मी दलित अत्याचारावर लढतो तसाच मराठा बहुजनांसाठी सुद्धा लढतो. दिल्ली बहुजन नेत्यांसाठी घातक आहे. लक्ष्यात घ्या, दिल्लीला जाऊन आल्यावर एकनाथ शिंदे आजारी असतील तर येते अनेकांचे गोपीनाथ मुंडे होतील. तुम्हाला दिल्ली वारी चांगली वाटत असेल तिथे दोन गुटगुटीत तुमचे स्वागत होत असेल पण मनुवादी विचार अन् विष एकच आहे तिथे कार्यक्रम लागतो म्हणजे लागतो. अनेक जण अवघ्या दोन वर्षांपूर्वी चांगले असलेले आता वाकून चालतात हे असच होत नाही हे लक्ष्यात घ्या आणि दिल्लीला गेल्यावर काळजी घ्या अशी मिश्किल खिल्ली सुद्धा त्यांनी उडवली आहे.
गेल्या नऊ वर्षात अनेक नेते संधिग्ध पद्धतीने संपलेले देशाने बघितलेले आहेत.गोपीनाथ मुंढे, मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज, अरुण जेटली, रामविलास पासवान हे लोकं अशीच गेलीत का? कुठे तरी काही तरी घडतंय त्याशिवाय हे होत नाही असे ही मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.