बुजगावण महाराष्ट्रातून हद्दपार करा अन्यथा देश बंद करू – दिपक केदार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेसाठी…
पिंपरी चिंचवड बंद मधे ऑल इंडिया पँथर सेनेची डरकाळी…
अवमान करणारे बुजगावणे महाराष्ट्रातून हद्दपार करा अन्यथा “देश बंद” करण्याची ताकद बहुजनामध्ये आहे. आमदारकीसाठी मुगगिळून बसलेल्यांनी गांडीत शेपूट घातलं आहे आम्ही त्या आऊलादी नाहीत. लाज वाटली पाहिजे यांना आमदारकी महत्वाची आहे, छत्रपति शिवाजी महाराज यांना महत्वाचे वाटत नाही. मी येते का असं वाटतं असेल आम्ही काहीही खपवून घेऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेणार नाहीत.
याद राखा, ठरवून शिवाजी महाराजांना टार्गेट केलं जातंय, सुधांशू त्रिवेदी, प्रसाद लाड, रावसाहेब दानवे हे पुन्हा खासदार आमदार कसे काय होतायत तेच बघू.
कुणासोबत छत्रपती ना जोडतात? त्यांची आउकात काय? या आंदोलनाची दखल घ्या अन्यथा देश बंद करू वेळ पडली तर राजभवनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन येऊ, राज्यात जिथे जिथं आंदोलन होतील तिथे आम्ही राहणार हा विषय आमच्या बापाच्या अस्मितेचा आहे!
अशी भूमिका या निषेध सभेत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी व्यक्त केले.