बकरी शेतात गेली म्हणून बौध्द वृद्धाचे तोंड फोडले!

बुलढाणा : मेहकर तालुक्यातील पासला गाव आहे. या गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सून बकऱ्या घेऊन चारायला गेली. जातीयवादी गुंडांच्या शेतात बकरी गेली, एवढ्या लहान कारणावरून त्यांनी बौध्द महिलेला शिवीगाळ केली. का शिवीगाळ करताय म्हणून जाब विचारायला गेलेल्या सासऱ्याला बेदम मारहाण केली यात त्यांचं तोंड फुटून गेलं आहे. जीवघेण्या हल्ल्यात ते थोडक्यात वाचले आहेत
मेहकर च्या दौऱ्यावर असताना ही दुर्दैवी घटना कळाली. पीडित कुटुंब भेटायला आलं त्यांनी वेदना सांगितल्या. 10 दिवस उलटून सुद्धा आरोपी अटक नाहीत आणि एफ आय आर सुद्धा दाखल झालेली नाही. किरकोळ कलम लावून केस लुज करण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी पोलीस प्रशासनाला राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी हिसका दाखवून दिला. 354, 307, atrocities ॲक्ट अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करा अन्यथा तुम्हाला माझी स्टाईल माहित आहे अशा इशारा दिला. त्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. तात्काळ आरोपी अटक न केल्यास रस्त्यावर उतरून न्याय दिला जाईल!
#पँथरनामा टीम