महाराष्ट्र

विनायक मेटे प्रकरण : कुठं तरी काहीतरी “कडी” मिसिंग आहे! – दिपक केदार

फेसबुक पोस्ट : माझ्यावर सेलुत हल्ला झाला होता, तेंव्हा 15 मिनिटात शेकडो कार्यकर्ते आणि तासाभरात हजारो कार्यकर्ते धावून सेलुत आले होते. विनायकराव मेटेंचे राज्यभर पक्ष-संघटन आहे, ते एक दोन तास तिथे विना मदत पडून होते, हे मनाला पटणार नाही!
कुठं तरी काहीतरी “कडी” मिसिंग आहे!
या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. अशी पोस्ट ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केलेली आहे.

पनवेल, खालापूर तेथून अवघ्या काही मिनिटाचा अंतरावर आहे. त्या रात्री मराठा क्रांती मोर्चाचे सर्वच मराठा नेते सुद्धा त्या रस्त्याने प्रवास करत असतील. त्यातील काहींना विनायकराव मेटे कॉलवर बोलले सुद्धा असतील, ते ड्रायव्हरच्या सुद्धा परिचित असतील त्या नेत्यांना सुद्धा तात्काळ का समजले नसावे? यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित राहिलेत, बीड जिल्ह्यातील राजकीय अड्डयावरील खाजगी चर्चा सुद्धा गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. जर का सातत्याने महाराष्ट्रात सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते असे संशयीपणे मरत राहतील, तेंव्हा कुणीही पुढे येणार नाहीत. ऊसतोड कामगारांचे पोरं नेते व्हायला लागलेत, हे अनेकांना पचत नाही. आता बीड जिल्ह्यातील कुटुंबात सहज चर्चा होते, बघ त्या गोपीनाथ मुंडेंचं काय झालं, बघ त्या अमोल गलदरचं काय झालं, बघ त्या विनायक मेटेच काय झालं. आपल काम धंदा कर ते राजकारण नको अशी धारणा सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांच्या घरची झालेली असल्याचे मत त्यांनी पँथरनामाशी बोलताना सांगितले.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!