Uncategorized

अन्याय-अत्याचाराविरोधात ‘पँथरनामा’चा बुलंद आवाज : राज्यभर प्रतिनिधी नेमणूक सुरू

आजच्या काळात मुख्य प्रवाहातील मनुवादी माध्यमे दलित, आदिवासी, मुस्लिम तसेच बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात गप्प बसल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘पँथरनामा मीडिया’ हे अन्याय-अत्याचाराविरोधात ठाम भूमिका घेऊन समाजाच्या हक्कासाठी लढणारे व्यासपीठ म्हणून पुढे सरसावले आहे.

पँथरनामा मीडिया राज्यभरातील सामाजिक, राजकीय आणि स्थानिक प्रश्नांवर बुलंदपणे आवाज उठवणार असून, अन्यायग्रस्त समाजाचे प्रश्न जनतेसमोर मांडणार आहे. यासाठी राज्यभर प्रतिनिधी नेमणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

संपादकांनी दिलेल्या माहितीनुसार, पँथरनामा मीडिया आधुनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर जनतेचा आवाज पोहोचवणार आहे. अन्यायाविरोधात लेखणी आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून लढा देण्याची तयारी पँथरनामा करत आहे.

इच्छुकांनी प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन संपादकांनी केले आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!