खडकपाडा पोलीस स्टेशन उभारणी पासून नव्हते महापुरुषांचे फोटो.. ऑल इंडिया पँथर सेनेनी लावले फोटो…

कल्याण : २०१५ साली कल्याण मध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन ची उभारणी करण्यात आली. गेल्या सात वर्षांपासून खडकपाडा पोलीस स्टेशन येथे एकही महापुरुषांच्या प्रतिमा नव्हत्या ही बाब ऑल इंडिया पँथर सेनेच्या निदर्शनास आली. तात्काळ ही गोष्ट आम्ही महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि मुंबई प्रदेश कमिटी यांच्या सोबत चर्चा केली.
आज ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक मा.दिपकभाई केदार यांच्या वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमान संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दिवशी आंबेडकरी चळवळ बळकट करण्यासाठी आम्ही आज कल्याण मधील खडकपाडा पोलीस स्टेशन इथे जमून अखंड भारताचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा वरीष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस.पाटील साहेब यांच्या उपस्थितीत खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आले .सदर कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कल्याण तालुका कमिटी सोबत बौद्धचार्य गौतम मोरे आणि ओमकार शेंडगे सुद्धा उपस्थित होते.
खडकपाडा पोलीस स्टेशनमधील व.पो.नि. पाटील यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पूर्ण पोलीस ठाण्यात पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आले.
ठाणे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संदीप जाधव, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख किरण वीर, कल्याण ग्रामीण अध्यक्ष किरण भालेराव, कल्याण महिला अध्यक्ष चंद्रकला गाडे, पिसवली विभाग प्रमुख संतोष धनसरे, मोहोने शहर अध्यक्ष अमोल पोळके, मोहोने महिला अध्यक्ष सुनीता शेंडगे, मोहोने शहर सचिव प्रवीण शेंडगे, बौद्धाचार्य गौतम मोरे, नवी मुंबई अध्यक्ष दीपक वंजारी, नवी मुंबई उपाध्यक्ष सतीश भवरे, नवी मुंबई सचिव अक्षय पोळ, नवी मुंबई युवा अध्यक्ष जयेश इंगळे इत्यादी उपस्थित होते.