चळवळ

ऑल इंडिया पॅंथर सेनेची मुर्तीजापुर तालुक्यात बैठक संपन्न…

अकोला : राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार, महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाई भोळे, विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली.. जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वात.. आढावा बैठक, संघटन बांधणीचे मार्गदर्शन, शाखा स्थापना विषयी चर्चा करण्यात आली. लवकरच मुर्तिजापुर तालुका व शहरात नियुक्ती व तालुक्यात दलित, मुस्लिम, शोषीत, पीडितांच्या समस्येला वाचा फोडण्यात येईल, अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांच्याकडून मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. एस. टी महामंडळाला ऑल इंडिया पॅंथर सेनेने निवेदन सादर केले होते, नवसाळ मार्गे कुरुम बस फेऱ्या चालू करण्याबाबत व बस थांबा या मागणीसाठी आंदोलन लोकशाही मार्गाने छेडण्याचा इशारा दिला. व तालुका अध्यक्ष मंगेश बागडे यांनी कार्यकर्त्यांना संघटने विषयी माहिती दिली.

यावेळी तालुका अध्यक्ष मंगेश बागडे, ता सचिव रफीक शाह, ता महासचिव सचिन ठवरे, ता उपमहासचिव सिद्धार्थ वानखेडे, ता संगठक साबिर शाह तालुका उपाध्यक्ष गंगाताई गवई शहर, अध्यक्ष धम्मा बागड़े, कट्टर समर्थक अमित वाघमारे व अन्य कार्यकर्ते उपस्थित उपस्थीत होते….

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!