चळवळ
ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने अर्धापूर तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर..


नांदेड : अर्धापूर येथील प्रज्ञा बौध्द विहारातील म. ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळे उभारणी संदर्भात विशेष समिती नेमण्यात यावी.
अर्धापूर तालुक्यात अनेक गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
मौ. सांगवी येथील बहुजन वस्ती पुनर्वसित करण्यात यावी.
केशरी राशन कार्ड धारक लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून देण्यात यावे.
यावेळी सुरेश सावते, गणेश कांबळे, लक्ष्मण डोंगरे, साहेबराव सरोदे, अभिजित सरोदे, हर्षवर्धन सरोदे,स्वप्नील सरोदे, राजू सरोदे, शुभम भालेराव, राज गव्हाणे, कचरू सरोदे इत्यादी पँथर कार्यकर्ते उपस्थित होते.