चळवळ

पंचरंगी व निळ्या ध्वजाशेजारी अज्ञात व्यक्तींनी भगवा ध्वज; ऑल इंडिया पँथर सेना हिंगोली टीम गेली धाऊन!

हिंगोली : आज दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी पारोळा ता. जि हिंगोली येथे बौद्ध धर्मियांनी
समाजमंदिराच्या नियोजित जागेवर लावलेल्या पंचरंगी व निळ्या ध्वजाशेजारी अज्ञात व्यक्तींनी भगवा ध्वज लावला. पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन दोन्ही ध्वज काढले . बौद्ध धर्मीयांनी दहा वर्षापासून जागा पकडुन वर्गणी करून तार कंपाऊंड लावले आणि जागा नमुना नंबर ८ वर लावण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असताना केवळ दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी व बौद्ध समाजाला जागा मिळू नये याकरिता हा प्रकार करण्यात आला आहे. मी हिंगोली बाहेर असल्याने सदर प्रकरण कळताच ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा नेते नितीन भाऊ खिल्लारे यांना प्रकरणाची माहिती देऊन गावकऱ्यांशी फोनवर चर्चा केली. गावकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी,समाज कल्याण आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ऑल इंडिया पँथर सेना सदैव गावातील समाजबांधवांसोबत आहे असे वचन दिले .जागा जोपर्यंत समाजाच्या नावावर होत नाही जोपर्यंत त्याच जागेवर समाजमंदिर बांधण्यात येत नाही.तोपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा नेते नितीन भाऊ खिल्लारे , ॲड.रावण धाबे,हिंगोली युवा ता. अध्यक्ष प्रशांत भाऊ जावळे, पारोळा गावातील समाजबांधव तसेच ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा हिंगोलीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!