मुंबई पोलिसांचा जातीय भेदभाव उघड! शिवसेनेला परवानगी पँथर सेनेला परवानगी नाही!

मुंबई : ऑल इंडिया पँथर सेनेनी राणीचा बाग ते आझाद मैदान अशी परवानगी मागितली होती. अक्षय भालेराव हत्याकांड, दलित अत्याचार, गायरान जमीन, स्वतंत्र बजेट कायदा अशा मागण्यांसाठी राज्यव्यापी मोर्चाचे नियोजन केले होते. ऑल इंडिया पँथर सेनेचे मुंबई अध्यक्ष संदेश वाघचौरे, मनोज खाडे यांनी चार बैठका डीवायएसपी प्रवीण मुंढे यांच्यासोबत करून विनंती केली की कुठून तरी आम्हाला परवानगी द्या!
तात्काळ संदेश वाघचौरे, संतोष गायकवाड, मनोज खाडे, कृष्णा दिवेकर यांना 149 ची नोटीस देऊन उच्च न्यायालयाचा निर्णयाचा दाखला देण्यात आला. गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वारंवार विनंती केली पण त्यांनी ऐकले नाही.
सर्वच प्रस्तापित घाबरलेले होते, सत्ताधारी तर गायब झाले होते. मोर्चा अफाट होणार याची त्यांना जाणीव होती म्हणून संभ्रम निर्माण करून आंदोलन दडपण्याचा खोडसाळपणा त्यांनी केला.
मुंबई पोलीस ही जातीय भेदभाव करते हा आमचा आरोप आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा होता त्याला परवनगी दिली, काल शिवसेनेला सुद्धा मेट्रो सिनेमा पासून परवानगी दिली. आम्ही मेट्रो सिनेमा येते जमायला सुरवात केली तर त्यांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करून गाड्यात टाकून आझाद मैदानात सोडून दिले. सुडभावना, जातीय दृष्टिकोन यातून दिसत होता.
शिवसेनेला परवानगी असते पण निळ्या झेंड्यायाला परवानगी नसते हा भेदभाव आहे. आणि एकप्रकारे अट्रोसिटी सुद्धा आहे. ऑल इंडिया पँथर सेना मुंबई पोलीसांनी केलेल्या भेदभावाचा निषेध करत आहे. पोलीस आयुक्तांनी याची चौकशी करावी. आठ दिवस परवानगी अर्ज देऊनही ही कुटूनच परवानगी का दिली नाही?