चळवळ
उद्या दिपक केदार श्रीरामपुरला

अहमदनगर : हारेगाव दलित मुलांना अमानुष मारहाण प्रकरण राज्यभर गाजले आहेत. दलित घटकांमध्ये मोठा संताप निर्माण झालेला आहे. कबुतर चोरच्या संशयावरून मुलांना सहा तास झाडाला टांगून मारले आहे. तांगडे पाटील नामक जातीय आतंकवादी याने हे कृत्य घडवले आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रिय अध्यक्ष दीपक केदार यांनी सर्व आढावा घेतला असून आजच्या हारेगाव बंद मध्ये सुद्धा जिल्हा अध्यक्ष राम दारोळे यांनी भूमिका घेतली.
उद्या दिनांक 28 ऑगस्ट 2023 सकाळी 11 वाजता दिपक केदार पीडित मुलांना भेटण्यासाठी श्रीरामपूरला येणार आहेत. त्यांनी याआधीच आवाहन केलेलं आहे की सर्व आरोपी अटक करा अन्यथा या आतंकीना पँथर सरळ केल्याशिवाय राहणार नाही.